February 11, 2021

What is Project Management

प्रकल्प व्यवस्थापन (Project Management) म्हणजे काय ?

सर्वात आधी आपण बघु या कि प्रकल्प (Projectम्हणजे काय? 

सहसाआपल्याला शाळाकॉलेजमध्येकिंवा कामाच्या ठिकाणीप्रोजेक्ट्स करायला सांगितलेले असतात पण म्हणजे काय करायचेकसे करायचे,
त्याचे काही स्टँडर्ड्स आहेत का, techniques आहेत का, हे सहसाdetailमध्येशिकविले जात नाही. 

 Project ची सर्वात सोपी किंवा जवळची उदाहरणे म्हणजे,घराच्या आजुबाजुचे नवीन झालेलेरस्तेनव्याने बांधलेली मॉल चीबिल्डिंग किंवा भारताने
आकाशात सोडलेला एखादा उपग्रह – हे सर्व प्रोजेक्टच आहेत; अगदी ताजमहाल सुद्धा एक भव्यशानदार असाप्रकल्पच होता. 

आता वरील सर्व उदाहरणांमध्ये काही गोष्टीcommon असतात जसे कि तो मॉल बांधायला कधी सुरु केलातो बांधून पूर्ण झाला कधीमॉल बांधताना
१००१२५  लोकांनी काम केले असेल, त्यांचा पगार वेळच्या वेळी करणे, साहित्य खरेदी करणे,या सर्वाना काहीतरी पैसे लागले असतीलतो कसा बांधायचा याचे

काहीdesign तयारकेले गेलेअसेल, बांधकामाच्या परवानग्यामिळवल्या गेल्या असतीलआणि मग प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाले असतील.

याचप्रकारे आपण उपग्रहाच्या बांधणीचे पणimagination करू शकतो किंवा ताज महाल कसा बांधला असेल या विषयी अंदाज बंधू शकतो. 

एक गोष्ट लक्षात आली काते म्हणजे सर्व ठिकाणी वेळेचे (time), पैश्यांचे (budgetकिंवा कधी कधी माणसांचे (staffबंधन असू शकते.म्हणजेच,
प्रकल्प वेळेत तसेच sanctioned budget मध्येच पूर्ण व्हायला पाहिजे आणि ते सुद्धा कधी कधी मनुष्य बळाच्या कमतरतेसहित! 

 खरे तर हेच कोणत्याही प्रकल्पाचे वैशिट्य असते असे म्हणावे लागेलआणि शेवटीcustomer ला अपेक्षित असे उत्पादन (productकिंवा सेवा (service)
हि प्रोजेक्टच्या रूपाने तयार होते किंवा हस्तांतर (deliverहोते. 

Customer ला अपेक्षित म्हणतो तेव्हा असे गृहीत आहे कि प्रोजेक्ट च्या सुरुवातीला कस्टमर ने त्याचे काहीspecifications ठरवले होते आणि त्याप्रमाणेच
फायनल प्रॉडक्ट किंवाservice तयार झाले आहे.प्रत्येक प्रोजेक्ट हा एकच एक (uniqueआणि तात्पुरत्या स्वरूपाचा (temporaryअसतो.

आता Project Management साठी काही विशिष्ठ standards आहेत का, किंवा काही techniques असतात का, काही कोर्सेस आहेत का, या विषयी आपण पुढील ब्लॉग मध्ये वाचू. तोपर्यंत, स्वतःला जपा, काळजी घ्या.

Leave A Comment